1. {#1वधूची वराकडून प्रशंसा } [QS](त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. [QE][QS]तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. [QE][QS]तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या [QE][QS]शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत. [QE]
2. [QS]लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या वर आल्या आहेत, ज्यातल्या प्रत्येकीस जुळे आहे. [QE][QS]त्यांच्यापैकी कोणालाही हिरावून घेतलेले नाही. [QE][QS]त्याच्या कळपासारखे तुझे दात आहेत. [QE]
3. [QS]तुझे ओठ किरमिजी रंगाच्या धाग्याप्रमाणे आहेत. [QE][QS]तुझे मुख सुंदर आहे. [QE][QS]तुझ्या बुरख्याच्या आत, [QE][QS]तुझे गाल दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत. [QE]
4. [QS]तुझी मान दाविदाने शस्रगारासाठी बांधलेल्या मनोऱ्याप्रमाणे आहे. [QE][QS]ज्याच्यावर सैनिकांच्या एक हजार ढाली व कवचे लटकत आहेत. [QE]
5. [QS]हरीणीची जी जुळी, [QE][QS]जे दोन पाडस कमलपुष्पांच्यामध्ये चरतात [QE][QS]त्यांच्यासारखी तुझी दोन वक्षस्थळे आहेत. [QE]
6. [QS]दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. [QE][QS]तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, [QE][QS]ऊदाच्या टेकडीवर जाईन. [QE]
7. [QS]प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. [QE][QS]तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही. [QE]
8. [QS]लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. [QE][QS]लबानोनातून माझ्याबरोबर ये; [QE][QS]अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, [QE][QS]सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, [QE][QS]सिंहाच्या गुहेतून, [QE][QS]चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये. [QE]
9. [QS]अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, [QE][QS]तू माझे हृदय हरण केले आहेस. [QE][QS]तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने [QE][QS]तू माझे हृदय चोरले आहेस. [QE]
10. [QS]माझ्या प्रिये, माझ्या वधू, तुझे प्रेम फार सुंदर आहे. [QE][QS]तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. [QE][QS]तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे. [QE]
11. [QS]माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. [QE][QS]तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. [QE][QS]तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे. [QE]
12. [QS]माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू तर बंद केलेल्या बागेसारखी आहेस. [QE][QS]तू बंद असलेल्या झऱ्यासारखी, शिक्का मारलेल्या कारंज्यासारखी आहेस. [QE]
13. [QS]तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. [QE][QS]त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे, [QE]
14. [QS]मेंदी, जटामांसी, केशर, [QE][QS]वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. [QE][QS]तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत. [QE]
15. [QS]तू बागेतल्या कारंज्यासारखी, [QE][QS]ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, [QE][QS]लबानोनाच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस. [QE]
16. [QS](तरुणी आपल्या प्रियकराबरोबर बोलते) उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, [QE][QS]माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. [QE][QS]माझा सखा त्याच्या बागेत येवो [QE][QS]आणि त्याच्या आवडीची फळे खावो. [QE]